हस्ताक्षर हे मानवी जीवनास सर्वोत्तम आकार देते - बार्ट बॅगेट

Bart-Baget
Bart-Baget

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवार २७ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी 3 वाजता आंतरराष्ट्रीय किर्तीचे हस्ताक्षर तज्ज्ञ आणि अमेरिकन हँण्ड रायटींग यूनिवर्सिटीचे प्रेसिडेंट बार्ट बॅगेट यांच्याशी वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी बोलताना बॅगेट यांनी मानवी जीवनास सर्वोत्तम आकार देण्याचे काम हे आपले हस्ताक्षर करीत असते. त्यामुळे शालेय जीवना़पासून आपले हस्ताक्षर हे सुंदर कसे होईल या प्रयत्नात राहिले पाहिजे. ज्यांचे हस्ताक्षर सुंदर तीच व्यक्ती विद्वान असते असे काहीही नसते कारण बऱ्याच विद्वान आणि कीर्तिमान लोकांचे हस्ताक्षर सुंदर नाही आहे असे म्हणत त्यांनी बिल गेट्स यांचे उदाहरण दिले. एक मात्र खरे आहे की, आपले हस्ताक्षर हे आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडविते.

आपले दैनंदिन व्यवहार पार पाडताना आपल्या हस्ताक्षरावरुन आपली ओळख समोरच्या व्यक्तिस चटकन होते. हस्ताक्षर हे विज्ञान आहे. मानवी मनाचे कंगोरे हस्ताक्षरांतून व्यक्त होत असतात. गत 20 वर्षां पासून जग भ्रमंतीवर असलेले बार्ट बॅगेट पुढे म्हणतात की हस्ताक्षरावरुन लोकांचे व्यक्तिमत्व दिसते. जीवनातील अंतरंग हस्ताक्षरावरुन शोधणे हे फारच सोपे आहे. गरज आहे ती त्याचा शोध घेण्याची आणि शिकण्याची. जगातील स्वभाषा प्रेमी लोकं आपल्या मुलांना लेखन कौशल्य बाबत जागृत ठेवत त्यांच्यात लिखाणाची गोडी उत्पन्न करीत आहेत, येथूनच हस्ताक्षर पुढील शतकोत्तर टिकून राहील. लेखन, वाचन आणि स्मरण कौशल्य वाढीस लागेल.

आपल्या व्यक्तिमत्व विकासात हस्ताक्षराचा मोठा वाटा असतो. आपण आपल्या हस्ताक्षरात सुधारणा अथवा बदल करुन आपल्या व्यक्तिमत्व विकासाला उत्तम चालना देऊ शकतो. तुम्ही पत्रकार मंडळी आपली पत्रकारिता करताना जशी माणसे ओळखता त्यांचे स्वभाव अभ्यासाने जाणता अगदी तसेच 'ग्राफोलॉजी'तही हेच आहे. सदयाची स्थिति अशी आहे की जेथे पहावे तेथे फक्त लोकं कॉम्प्यूटर, मोबाईलचा वापर करता.पूर्वी सारखे सातत्यपूर्ण लिखाण कमी झाले आहे. डिजिटल युगामुळे आणि झालेल्या अभूतपूर्व क्रांतिमुळे सोशल मिडियातही क्रांती झाली आहे. सर्वांची बोटे आता फ़क्त सर्फिंगवर रुळली आहेत आणि महत्वाचे म्हणजे आपण बोटांमध्ये पेन पेन्सिल धरणे फारच कमी केलेले आहे. त्यातच भारतासारख्या लोकसंख्येच्या देशात सर्वसाधारण वर्गात हस्त लेखन हा प्रकार कमी कमी होत लयास जातोय की काय? अशी भिती व्यक्त होतेय. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे मत बॅगेट यांनी व्यक्त केले. 

ग्राफोलॉजी म्हणजेच हस्ताक्षरावरुन मानवी स्वभाव ओळखणे होय. सर्वच लोकांचे हस्ताक्षर चांगले असतेच असे नाही. काही डॉक्टर आणि काही उच्च शिक्षित तज्ज्ञ लोकांचे हस्ताक्षर हे चांगले नसते म्हणून ते जीनियस नाहीत का? ते जीनियसच आहेत. सुंदर हस्ताक्षरापेक्षा ते काय शिकतात, आत्मसात करतात ते फारच महत्वाचे आहे.

एखादा न्यायवैद्यक हस्ताक्षरतज्ज्ञ हा जेव्हा न्यायवैद्यक हस्तलेखन हस्ताक्षर तज्ञ म्हणून तपासाबाबत त्याच्याकड़े आलेल्या केसचा अभ्यास करताना एखाद्या मालमत्तेच्या वादात नकली सह्या करुन किंवा हस्ताक्षरात असलेल्या मूळ मजकुरात फेरबदल करुन मृत्युपत्र सादर केल्यानंतर ते तपासाअंती असत्य असल्याचे सिद्ध करु शकतो. इतके महत्त्व हस्ताक्षर तज्ज्ञास प्राप्त होते. अमेरिकेतील गुन्हेगारी संदर्भात विशेष गुन्ह्यात संशोधन करण्यात हातखंडा असलेले पोलिस विभागाला विविध गुन्ह्यांची उकल करताना नेहमी सहकार्य करणारे बार्ट बॅगेट यांची 10 पुस्तके जगात उपलब्ध आहेत. त्यातील मॅजिक क्वेशन आणि सक्सेस सीक्रेट ऑफ़ द रिच एन्ड हॅप्पी ही पुस्तके फारच लोकप्रिय असल्याचे ते सांगतात.

हस्ताक्षरातील लिखाण करताना पेन-पेन्सिल यांचे वळण एक समान नसते. काहींचे एका रेषेत सरळ तर काहींचे तिरपे, तर काहींचे रेषेच्या वर खाली होत असते. हस्ताक्षर ही एक कला असून ती सर्वांना सहज आत्मसात करता येऊ शकते. याला प्रयत्नांची आणि सातत्याची जोड़ असावी लागते. वार्तालाप प्रसंगी व्यासपीठावर बार्ट बॅगेट यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि सह सचिव सुरेश वडवलकर हे उपस्थित होते.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले की, पत्रकारांना हस्ताक्षर विश्लेषणाची महत्वे कळावीत त्यांची जीवन विकासात उपयुक्तता व्हावी म्हणून हा कार्यक्रम ख़ास करुन आयोजित करण्यात आलेला होता.
 अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी बार्ट बॅगेट यांचा स्वागत सत्कार करताना दिलेली शाल बॅगेट यांनी कार्यक्रमानंतरही तशीच गळ्यात ठेवली होती. त्यांना या शालीचे भारीच अप्रूप वाटत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com