कोकण मार्गावरील खड्ड्यांची 22 ऑगस्टपर्यंत दुरुस्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सद्यस्थितीतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना वेग आला आहे. राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. 22 ऑगस्टच्या आत ही कामे पूर्ण होतील या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते डागडुजीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच 22 तारखेच्या आत ही कामे पूर्ण होतील या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.