बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मुंबई - बैलांच्या शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत राज्य सरकार तयार करत असलेल्या नियमांचा मसुदा आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आज सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार असल्यामुळे तोपर्यंत शर्यतींवरील मनाई कायम आहे.

बैलांच्या शर्यतींना विरोध करणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी आज सरकारच्या वतीने प्रमुख सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाला माहिती दिली. यानुसार सरकारने ऑगस्ट अखेरपर्यंत शर्यंतीच्या अधिसूचनेबाबत सूचना व हरकती मागविल्या होत्या. या सूचनांचा विचार संबंधित समितीद्वारे करण्यात येत आहे. लवकरच अंतिम मसुदा तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली. प्राणिप्रेमी संघटनांनी बैलांच्या शर्यतींना विरोध केला आहे. बैलांचा हिंसक छळ करून त्यांना शर्यतींमध्ये धावण्यास भाग पाडले जाते, असा आरोप याचिकादारांनी केला आहे.