सजतेय, नटतेय नवी मुंबई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - नवी मुंबईत १७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप होत असल्यामुळे युवा वर्गात उत्साह आहे. नेरूळमध्ये होणारे फिफाचे आठ सामने पाहण्यासाठी जगभरातून फुटबॉलप्रेमी उपस्थित राहणार असल्याने नवी मुंबईला सजवण्यात-नटवण्यात येत आहे.

फिफाचे सामने ६, ९ आणि १२ ऑक्‍टोबरला होणार आहेत. १८ ऑक्‍टोबरला राऊंड ऑफ सिक्‍स्टीन मॅच आणि २५ ऑक्‍टोबरला उपांत्य फेरी होणार आहे. फुटबॉलमधील नाट्य पाहण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी नवी मुंबईत येतील.

फिफाचे यजमानपद नवी मुंबईकडे आल्याने शहराची जगात चांगली प्रतिमा निर्माण व्हावी म्हणून मोक्‍याच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुशोभीकरण सुरू आहे. हे काम पूर्ण झाले की शहराचे एक वेगळेच रूप पाहायला मिळेल, असा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी नुकतीच शहर सुशोभीकरणाच्या कामांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शहरातील सुशोभीकरण सुरू करण्यात आले. पाम बीच रस्त्याची साफसफाई करण्यात आली. आता रस्त्याच्या दुभाजकांची रंगरंगोटी सुरू आहे. वाशीतून बाहेर पडून पाम बीचवर आल्यावर लागणाऱ्या उड्डाणपुलाखाली भिंतीवर फुटबॉल खेळतानाची छायाचित्रे रंगवण्यास सुरुवात झाली आहे. नेरूळमध्येही भिंतींवर चित्रे काढण्यात येत आहेत. शहर फुटबॉलमय करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.  फिफाचे सामने नेरूळमध्ये होणार असल्याने महापालिकेने त्या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. झाडांच्या फांद्यांची छाटणी करून रस्ते मोकळे केले जात आहेत. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत काढून रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे.

Web Title: mumbai news FIFA World Cup football