कल्याणमध्ये 13 झाडे कोलमडली; विजेच्या कडकडाटात पाऊस

शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

  • गुरुवारी रात्री विजेचा कडकडात पावसाची हजेरी...
  • कल्याण पूर्वमध्ये 13 झाडे कोलमडली...

कल्याण : गुरुवारी रात्री विजेचा कडकडाट करत मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली, यात 13 झाडे कोलमडली असून यात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाले नसल्याचे समजते मात्र काही काळ नागरिकांना अंधारात राहावे लागले .

गुरुवार ता 28 रोजी सायंकाळी सात साडे सात नंतर अचानक कल्याण, डोंबिवली शहरी व ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली, यावेळी विजेचा कडकडाट ही झाला यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने ऐन नवरात्र मध्ये काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली, जोरदार हवा असल्याने कल्याण पूर्व मध्ये  लक्ष्मण पावशे चाळ शँकर पावशेरोड काटेमानेवली, विनायक कॉलनी खडगोलवली, साईबाबामंदिर नांदवली चिंचपाडा, गणराज कॉलनी आशेळेपाडा, म्हसोबा चौक, विठ्ठलवाडी शिवसेना शाखेजवळ, खडगोलवली, चिंचपाडा रोड आदी  13  ठिकाणी झाडे कोलमडली, घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या आपत्कालीन अग्निश्यामन दलाने धाव घेतली शुक्रवारी सकाळपर्यन्त 6 झाडे बाजूला करण्यात अग्निश्यामन दलाला यश आले असून पुढील काम सुरू असून या घटनेत कुठलीही जीवित हानी अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती अग्निश्यामन दलाकडून सांगण्यात आले .

मुसळधार पाऊस आणि झाडे कोलमडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

गुरुवारी रात्री झाडे पडल्याची सूचना जशी मिळत होती तशी अग्निश्यामन दलाचे जवान घटना स्थळी जावून आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना काही नागरिक आग्रह धरत होते की तिकडचे काम सोडून इकडे या तिकडे जा, नागरिकांना आवाहन आहे की घटना घडल्यावर अग्निश्यामन आपल्या परीने काम करत असते रात्रीचे काम कठीण आणि जीवाला धोकाही पोहचू शकतो त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी काम पूर्ण करण्याचे तगदा लावू नका, असे आवाहन अग्निश्यामन दल अधिकारी दिलीप गुंड यांनी केले आहे.

Web Title: mumbai news kalyan dombivali rains trees collapse