मुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहिर, ९० टक्के मुल्यांकन पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

वाणिज्य व विधी विद्याशाखा वगळता बहुतांश शाखेतील ९० ते ९८ टक्के मुल्यांकन झालेले आहे. विविध विद्याशाखेतील ५५ निकाल तयार असून ते लवकरच जाहिर केले जाणार आहेत.

मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखेतील १५३ निकाल विद्यापीठाने जाहिर केले असून यामध्ये  कलाशाखा- ७८, तंत्रज्ञान-४८, विज्ञान-१०, व्यवस्थापन-१०, वाणिज्य-७, असे एकुण १५३ निकाल जाहिर करण्यात आले आहेत.

वाणिज्य व विधी विद्याशाखा वगळता बहुतांश शाखेतील ९० ते ९८ टक्के मुल्यांकन झालेले आहे. विविध विद्याशाखेतील ५५ निकाल तयार असून ते लवकरच जाहिर केले जाणार आहेत.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर विद्यापीठाची मदत घेत मुल्यांकनाच्या कामाला गती मिळाली आहे. एकुण १७ लाख ३६ हजार १४५ उत्तरपत्रिकांपैकी ९० टक्के उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन झाले आहे तर ३ लाख २५ हजार ३०५ उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन लवकरच विद्यापीठातर्फे केले जाणार आहे.