मुंबई- अहमदाबाद मार्गावर अपघात; वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

 ही घटना पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहन चालकास झोप लागल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे

मुंबई - मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा वर "कुडे" या ठिकाणी दोन कंटेनरमध्ये अपघात झाला असून वाहनांनी पेट घेतला आहे. ही घटना पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहन चालकास झोप लागल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

 अग्निशामक दल घटना स्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, या मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक एका दिशेने सुरू ठेवण्यात आली आहे.