मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रो अँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला आहे. मंगळवारी दुपारी 4.30 वाजल्यापासून डॉ. अमरापूरकर बेपत्ता होते. 

मुंबई - मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह आज (गुरुवार) सकाळी सापडला. 

डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रो अँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला आहे. मंगळवारी दुपारी 4.30 वाजल्यापासून डॉ. अमरापूरकर बेपत्ता होते. 

मुसळधार पावसामुळे 29 ऑगस्टला मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अनेक लोक वाहने रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. अमरापूरकरही दुपारी 4.30 च्या सुमारास प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होते. लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा अमरापूरकरांचा विचार होता. एलफिन्स्टन पश्चिम भागात त्यांनी आपली गाडी सोडली होती. गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नव्हते. 

पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी एल्फिन्स्टनमधील मॅनहोलचं झाकण काढले होते. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले. तेव्हापासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.

मुंबई

मुंबई - "फेमा' कायद्याचा भंग केल्याबाबत ईडीच्या नोटिशीनंतर बुधवारी अभिनेता शाहरूख व गौरी खान यांचे वकील अंतिम सुनावणीसाठी...

01.39 AM

मुंबई - शाळा व महाविद्यालयांकडून व्यावसायिक दराने वीजदर न आकारता घरगुती दर लावावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने सरकारकडे केली...

01.39 AM

दादर - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानचा एल्फिन्स्टनमधील सेनापती बापट मार्गावरील मीनाताई ठाकरे मच्छीमार्केटच्या परिसरात...

01.30 AM