प्रिया दत्त यांची सचिवपदावरून उचलबांगडी

Priya-Dutt
Priya-Dutt
Updated on

मुंबई - माजी खासदार प्रिया दत्त यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कार्यकारिणीच्या सचिव पदावरून उचलबांगडी केली आहे. तसे अधिकृत पत्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहोलत यांनी घोषणा केली आहे.तसे अधिकृत पत्र दत्त यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रात त्यांच्या कामाबद्दल प्रशंशा करण्यत आली आहे.

अशोक गेहलोत यांनी प्रिया दत्त यांना 26 सप्टेंबर रोजीच पत्र पाठवून त्यांना सचिवपदावरून हटवण्यात येत असल्याचे कळवले आहे. या शिवाय भविष्यात त्यांची पक्षाला गरज भासणार असल्याचे ही या पत्रा म्हटले आहे. 

उत्तर मध्य मतदारसंघात कॉंग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली आलिकडेच एक बैठक पार पडली होती. यावेळी निरुपम यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून दत्त यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या नावाची घोषणा होताच कॉंग्रेस कार्यकर्त्याने त्याला विरोध करत जोरदार गोंधळ घातला आसल्याचे समोर आले आहे. दत्त या मतदारसंघात 2014 पासून फिरकल्या नाहीत असे असताना त्यांच्या नावाची घोषणा कशी करता? असा सवाल या बैठकीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करून निरुपम यांना जाब विचारला. त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com