ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

कळवा स्टेशन रोड परिसरात दत्तवाडी येथे राहणाऱ्या एकाची गाळा मालक असणाऱ्या पती, पत्नी व इस्टेट एजंट यांनी गाळा देण्याच्या बहाण्याने 50 लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कळवा (जि. ठाणे) - कळवा स्टेशन रोड परिसरात दत्तवाडी येथे राहणाऱ्या एकाची गाळा मालक असणाऱ्या पती, पत्नी व इस्टेट एजंट यांनी गाळा देण्याच्या बहाण्याने 50 लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कळवा दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या पोपटराव भास्कर चौधरी यांनी स्टेशन रोडवर असलेल्या जैनम आरकेंड येथे तळमजल्यावर असलेल्या गाळा क्र 4 हा इस्टेट एजंट सतीश रिचारला यांच्या मध्यस्थीने या गाळ्याचे मालक शर्मिला कपोते व हिरोज कपोते यांच्या कडे 50 लाखाचा व्यवहार 5 ऑक्‍टोबर 2016 रोजी केला होता या व्यवहारात चौधरी यांनी 20 लाख रुपये रोख रक्कम व 30 लाख रुपये लोन असे 50 लाख रुपये कपोते दांपत्याना दिले आहेत परंतु आठ महिने उलटल्या वर ही गाळा नावावर न केल्याने शनिवारी चौधरी यांनी कळवा पोलिसात तक्रार दाखल केली कळवा पोलीसांनी या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, या संदर्भात कळवा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

टॅग्स