कऱ्हाड शहरातील रखडलेल्या कामांना गती येण्याची शक्यता

कऱ्हाड शहरातील रखडलेल्या कामांना गती येण्याची शक्यता
Updated on

कऱ्हाड  ः शहरातील रखडलेल्या कामांवर थेट नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे त्या कामांना गती येण्याची शक्यता आहे. काम व त्याचा दर्जा नगराध्यक्ष स्वतः कामाचा ठिकाणी जावून पाहत आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामांना गती मिळू लागली आहे. त्यासह नागरीकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी त्यांनी कालपासून थेट नागरीकांशी संवाद साधण्यासही सुरू केले आहे. प्रत्येक मंगळवारी नगराध्यक्षा आपल्या दारी हा उपक्रम त्यांनी जाहीर केला आहे. त्याचे शहरातून स्वागत होत आहे. पालिकेचे त्यांच्या पक्षातील सदस्य त्यांच्या सोबत आहेत. मात्र अन्य सदस्य त्याकडे कसे पाहतात, यावर बरच काही अवलंबून आहे. 

पालिकेची अनेक विकास कामे रखडली आहे. त्यात काही ठेकेदारांच्या आडमुठे पणामुळे काही कामे अंतीम टप्प्यात असूनही ती रखडवली जात आहे. त्याबाबत मध्यंतरी पालिकेच्या स्टॅंडीग कमिटीच्या मिटींगमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यानंतर नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी थेट लोकांशी संवाद साधण्याचे ठरवले आहे. त्याबाबत त्यांच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी ही बाब त्यांच्या सहकारी सदस्यांना सांगितले. त्याबाबत ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यासह त्यांच्या सोबतच्या नगगरसेवकांनी त्याला पाठिंबा देत सहमती दर्शवली. ती गोष्ट बाहेर कोणास सांगतिली नाही. त्यांनी थेट प्रत्यक्ष कालपासून कामास सुरवात केली. त्यांनी कालच्या पहिल्या मंगळवारी भाजी मंडई परिसरात भेट दिली. तेथील काय कामे अर्धवट आहेत. त्याची पहाणी केली. व्यापाऱ्यांना काय सुविधा अपेक्षीत आहेत. तेथे काय तातडीच्या सुविधा देता येतील, याची त्यांनी पहाणी केली. तातडीच्या सुविधा त्वरीत देण्याबाबतचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार तातडीच्या सुविधा येत्या आठ दिवसात त्या भागात देण्यात येतील. त्यांच्या सोबत पालिकेचा अधिकारीही होते. त्यामुळे त्यांना त्या समस्यांचे अवलोकन झाले आहे. 

नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी कालपासून सुरू केलेल्या नगराध्यक्षा आपल्या दारी उपक्रमाचे शहातून कौतुक होत आहे. यापूर्वी लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव यांच्या 2001 च्या कालवधीत पालिका आपल्या दारी उपक्रम हाती घेण्यात आला होता. पालिकेचे अधिकारी, प्रत्येक वार्डातील नगरसेवक व स्वतः नगराध्यक्ष त्या मोहिमेत सहभागी होत होते. आठवड्यातील एक दिवस त्यासाठी राखीव होता. काही दिवस ती योजना चांगली चाललीही, त्यामाध्यमातून अनेक कामे त्यावेळी मार्गी लागली होती. त्यानंतर आता तब्बल 16 वर्षांनी पुन्हा त्याच धाटणीचा कार्यक्रम हाती घेवून नगराध्यक्षा सौ. शिंदे लोकांपुढे येत आहेत. त्यांच्या भुमिकेचे लोकतून स्वागत होत आहे. पालिकेचे अधिकारीही त्यामुळे धास्तवले आहेत. पालिकेतील अन्य सदस्य त्याकडे कसे पाहतात, यावरही बरच काही अवंलबून आहे. नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी यापूर्वी चार ते पाच कामांना थेट भेटीही दिल्या आहेत. त्या कामांचा दर्जा फारच खराब असल्याचे त्यांना जाणवलेही आङे. त्याबाबत त्यांनी योग्य त्या हालचाली केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी रखडलेल्या कामावर लक्ष ठेवल्याचेही जाणवून गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जाहीर केलेल्या नगराध्यक्षा आपल्या दारी उपक्रमाची उत्सुकता लागून आहे. 

अनेक छोट्या समस्यांकडे पालिकेचे प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष होत असेत. त्या नागरीकांशी थेट संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना भेडसवणाऱ्या प्रश्नांची दखल घेण्यात येईल. त्याचा निपटारा लवकरात लवकर करून लोकभिमुख कारभार करण्याचा प्रय़त्न नगराध्यक्षा आपल्या दारी उपक्रमाद्वारे प्रयत्न राहील. 

- सौ. रोहिणी शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eight Students Cause Trouble On ST Bus Driver Conductor Stay Alert Emergency Door Incident Ends At Police Station
NGRI geophysical survey Maharashtra
Ara grapes variety Maharashtra farmers
‘Stree: Sangharsh Te Swarajya 2026’ special issue welcomed in Kundal.
Marathi News Esakal
www.esakal.com