कोयना धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

गेल्या २४ तासात कोयनानगरला ९८ (२५०५) मिलीमीटर, नवजाला ११५(२९६३) मिलीमीटर व महाबळेश्र्वरला १२६ (२३९१) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे

कऱ्हाड - कोयना धरण परिसरात पावसाचा जोर मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही गेल्या चोवीस तासात कोयना धरणात २.६२ टीएमसीने वाढ झाली आहे.

धरणाची पाणीपातळी सध्या २१२३.१० फुट असून एकूण पाणीसाठा ६४.६२ टीएमसी आहे. गेल्या २४ तासात कोयनानगरला ९८ (२५०५) मिलीमीटर, नवजाला ११५(२९६३) मिलीमीटर व महाबळेश्र्वरला १२६ (२३९१) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

कोयना धरणात सध्या प्रतिसेकंद ६१ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.