साताऱ्यात राजेंविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

तणाव वाढल्याने दोन्ही बंगल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रस्त्यात पोलिस अधीक्षक संदीप पाटील स्वतः पहाटे तीन वाजेपर्यंत तळ ठोकून होते. 

सातारा : दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर खासदार उदयनराजे भोसले शहर पोलिस ठाण्यात गेले. त्यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. यावेळी दोन्ही राजेंच्या समर्थकांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या. शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे या दोघांचीही नावे तक्रारींमध्ये आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा, जमाव जमविल्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

तत्पूर्वी, तणाव वाढल्याने दोन्ही बंगल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रस्त्यात पोलिस अधीक्षक संदीप पाटील स्वतः पहाटे तीन वाजेपर्यंत तळ ठोकून होते. पहाटे तीन वाजता ते शाहुपुरी पोलिस ठाण्यात गेले. तिथे दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदविण्याचे काम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. पहाटे पाच वाजता ते पुन्हा घटनास्थळी आले. तिथे आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावला. 

शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थकांना आवाहन

साताऱ्यातील सध्याची परिस्थिती

पोलिस बंदोबस्तामध्ये टोल वसुली चालू

सध्याचे चित्र....

राजे समर्थकांची गर्दी

शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक...