कोयना धरणात 85.66 टीएमसी पाणीसाठा

सचिन शिंदे
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. कोयना धरणात ८५.६६ टीएमसी पाणी साठा आहे. चोवीस तासात पाऊस होतोय, मात्र त्या हलक्या सरी आहेत. पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे.

कऱ्हाड : कोयना धरण परिसरात पाऊस पुर्ण ओसरला आहे. तरिही चोवीस तासात ००.५९ टीएमसीने पाणी साठा वाढला.

पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. कोयना धरणात ८५.६६ टीएमसी पाणी साठा आहे. चोवीस तासात पाऊस होतोय, मात्र त्या हलक्या सरी आहेत. पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाचे वक्र दरवाजे बंद केले. पायथा वीज गृहातुन सोडण्यात येणारे पाणीही बंद केले आहे.

चोवीस तासात कोयनानगरला १३ (३३७६), नवजाला २६ (३७४६) व महाबळेश्र्वरला १६ (३२११) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१४७.०६ फुट झाली आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद नऊ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.