पुणे शहरामध्ये २१० ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था

Ganpati-Visarjan-Tank
Ganpati-Visarjan-Tank
Updated on

पुणे - महापालिकेने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाची तयारी पूर्ण केली असून, शहरात २१० ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे. नदीवरील विसर्जन घाटांसह विविध भागात हौद आणि टाक्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत. घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी अमोनिअम बायकार्बोनेट पावडरही उपलब्ध केली आहे. 

शहरात सुमारे सहा लाख गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होते. त्यापैकी पाच लाखांहून अधिक मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. या गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने पाणी प्रदूषित होते. त्यामुळे घरच्याघरी गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी गेल्या वर्षीपासून अमोनिअम बायकार्बोनेट पावडरचा उपयोग करण्यास सुरवात केली गेली. गेल्या वर्षी १०१ मेट्रिक टन पावडर खरेदी केली होती. सुमारे ३९ हजार ४५७ नागरिकांना त्याचे वाटप केले होते. 

यंदाही तेवढीच पावडर खरेदी केली आहे. विसर्जन घाट, नदीपात्र, विहीर, बांधीव हौद, लोखंडी टाक्‍यांची व्यवस्था केली आहे. निर्माल्य गोळा करण्यासाठी विसर्जनाच्या ठिकाणी व्यवस्था केली असून, निर्माल्य कलश पुरविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी महापालिका आणि स्वच्छ संस्थेने सहा लाख किलो निर्माल्य गोळा करून त्यापासून खतनिर्मिती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com