मतदार यादीतून ५४ हजार नावे वगळली  

मतदार यादीतून ५४ हजार नावे वगळली  
Updated on

पुणे - आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष अभियानानंतर शनिवारी (ता. १) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या मतदार यादीमधून ५४ हजारांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत, तर २० हजारांहून अधिक तरुण मतदारांची नावनोंदणी करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू केले आहे. नवीन प्रारूप मतदार यादीनुसार पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण मतदारांची संख्या ७१ लाख ८९ हजार २६५ इतकी आहे. यापूर्वीच्या मतदार यादीमधून ५४ हजार ५८४ नावे वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये काही मृत व्यक्‍ती आहेत, तर उर्वरित काहीजण पत्त्यांवर राहत नसल्याचे आढळून आले. तर, प्रारूप यादीनुसार २० हजार २६४ तरुण मतदारांनी नावनोंदणी केल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली. 

प्रारूप मतदार यादीबाबत काही तक्रार असल्यास १ सप्टेंबर ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येतील. त्यानंतर ४ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नाव आढळून न आल्यास ऐनवेळी धावपळ होते. ते टाळण्यासाठी यादीत नाव आहे का, हे तपासून पाहावे. त्यात काही दुरुस्ती असल्यास ती दिलेल्या कालावधीत करून घ्यावी. मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे काहींच्या मतदान केंद्रात बदल होण्याची शक्‍यता आहे. संबंधित तहसील कार्यालयात किंवा संकेतस्थळावर मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- मोनिका सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादीनुसार
एकूण मतदार संख्या : ७१ लाख ८९ हजार २६५
पुरुष मतदार : ३७ लाख ६६ हजार ३३३
महिला मतदार : ३४ लाख २२ हजार ८१५
मतदार यादीत नाव पाहण्यासाठी संकेतस्थळ
https://ceo.maharashtra.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com