एअरपोर्ट @5 मिनिट्‌स

पीतांबर लोहार
बुधवार, 25 एप्रिल 2018

पिंपरी - चऱ्होली ते लोहगाव विमानतळ अवघे सहा किलोमीटर अंतर. मात्र, रस्त्याअभावी दिघी- विश्रांतवाडी मार्गे तब्बल २० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. अतिरहदारीमुळे एक तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. आता हे अंतर अवघ्या पाच मिनिटांवर येणार आहे. कारण, चऱ्होलीगाव ते लोहगाव रस्त्याचे काम सुरू झाले आहे. 

पिंपरी - चऱ्होली ते लोहगाव विमानतळ अवघे सहा किलोमीटर अंतर. मात्र, रस्त्याअभावी दिघी- विश्रांतवाडी मार्गे तब्बल २० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. अतिरहदारीमुळे एक तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. आता हे अंतर अवघ्या पाच मिनिटांवर येणार आहे. कारण, चऱ्होलीगाव ते लोहगाव रस्त्याचे काम सुरू झाले आहे. 

लोहगाव आणि चऱ्होली बुद्रुक या गावांची हद्द (शिव) एक आहे. लोहगावापासून चऱ्होलीच्या हद्दीपर्यंत (अजिंक्‍य डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ) रस्त्याचे काम झालेले आहे. तेथून चऱ्होलीपर्यंत कच्चा रस्ता आहे. त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण तीन टप्प्यांत केले जाणार आहे. हा रस्ता आळंदी व चऱ्होलीच्या बाहेरून आहे. चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीपासून चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) येथील दाभाडे वस्तीतील रस्त्याचे काम सुरू आहे. दाभाडेवस्ती ते कोतवालवाडी रस्त्याचे टेंडर लवकरच निघणार आहे. कोतवालवाडीपासून लोहगाव हद्दीपर्यंतचे काम सुरू आहे. सध्या या रस्त्याचा वापर दुचाकीस्वार व मोटारचालक करीत आहेत. 

दृष्टिक्षेपात रस्त्याचे काम 
रस्त्याचा एकूण प्रस्तावित खर्च ९७ कोटी रुपये आहे. पहिला टप्पा १७ कोटी, दुसरा टप्पा ४३ कोटी व तिसरा टप्पा ३७ कोटींचा आहे. रस्त्याची रुंदी काही ठिकाणी ४५, तर काही ठिकाणी ३० मीटर आहे. एकूण लांबी सव्वापाच किलोमीटर आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे.

रस्त्याचा फायदा 
पिंपरी-चिंचवड शहराचा बहुतांश भाग. तळवडे आयटी पार्क, देहूरोड कॅंटोमेन्ट बोर्ड, देहू व आळंदी तीर्थक्षेत्र. भोसरी, म्हाळुंगे, चाकण, मरकळ, तळेगाव दाभाडे एमआयडीसी. मावळ तालुक्‍याचा पूर्व भाग व संपूर्ण राजगुरूनगर (खेड) तालुका. 

सध्याची स्थिती 
पिंपरी-चिंचवडमधून चऱ्होलीपर्यंत जाण्यासाठी सध्या तीन रस्ते आहेत. एक : भोसरी- मॅगझीन कॉर्नरपासून ताजने मळामार्गे. दुसरा : स्पाइन रस्त्याने वखार महामंडळापासून वडमुखवाडी, चऱ्होली फाटा मार्गे. तिसरा : मोशी, डुडुळगाव, चऱ्होली फाटा मार्गे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून चऱ्होली- लोहगाव रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. आता टेंडर निघाले असून, तीन टप्प्यांत काम सुरू आहे. चऱ्होलीच्या हद्दीपासून अवघ्या एक किलोमीटरवर विमानतळ आहे. येथील एका शेतकऱ्याचा प्रश्‍न आहे. तोही लवकरच सुटेल. 
- नितीन काळजे, महापौर, पिंपरी-चिंचवड

Web Title: airport charholi road