दृष्टीहिनांना हवाय पीएमपीचा पास

Blind wants PMP pass
Blind wants PMP pass
Updated on

पुणे : "अंधत्व, मधुमेह, शारीरिक व्याधी, त्यात रस्त्यावरील गाड्यांची गर्दी, यामुळे घराबाहेर पडताना पत्नीचा सहारा घेण्याशिवाय पर्याय नसतो. अपंगत्वामुळे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही, मात्र प्रवासासाठी प्रत्येक वेळी द्यावे लागणारे पत्नीचे बस भाडे परवडत नाही. त्यामुळे उपचारांसाठीही घरातून बाहेर पडताना विचार करावा लागतो,'' अशी वेदना द्वारकादास शर्मा यांनी व्यक्त केली. 

महापालिकेतर्फे अंधासाठी मोफत पास दिला जातो. मात्र, त्यांच्यासोबत असणाऱ्या गाइडला पूर्ण भाडे आकारले जात असल्यामुळे त्याच्या भाड्याचा भार अंध नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेतून पीएमपीच्या प्रवासासाठी देण्यात येणाऱ्या पासचा फायदा होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वे आणि एसटीतर्फे अंधासोबत असणाऱ्या गाइडला सवलतीच्या दरात पास दिला जातो. त्याच धर्तीवर पीएमपीच्या प्रवासासाठी सवलतीतील पास दिला जावा, अशी मागणी अंध नागरिकांकडून केली जात आहे. 

अंध नागरिकांसाठी गाइड पाससाठी मागील वर्षापासून शर्मा प्रयत्न करीत आहेत. त्याबाबतची निवेदने पालिका अधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, याबाबत अद्यापही कोणतेच सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

रेल्वेतर्फे गाइड पासमध्ये मिळणारी सवलत - 75 टक्के 
एसटी गाइड पासमध्ये मिळणारी सवलत - 50 टक्के 


पुणे शहरातील अंध पासधारकांची संख्या - 1528 

सुस्थितीतील नागरिकांना बसने प्रवास करणे अवघड असताना अंध नागरिकांना जीव धोक्‍यात घालून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. अंधाबरोबर गाइड असणे, हा त्यांचा हक्क आहे. महापालिकेने रेल्वे आणि एसटीच्या धर्तीवर अंधांसाठी ही योजना सुरू करावी. 
- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच 

अंध नागरिकांबरोबर प्रवास करणाऱ्या गाइडसाठी पास आवश्‍यक आहे. या योजनेस आमचा पाठिंबा असून, लवकर निर्णय घेऊन प्रश्‍न मार्गी लावला जाईल. 

- सिद्धार्थ शिरोळे, संचालक, पीएमपी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com