#SSC : दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

सीबीएसई आणि आयसीएसई नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा (SSC) निकाल प्रलंबित होता.

पुणे : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता. 13) जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभराने लागत आहे.

गेल्या आठवड्यात लागोपाठ निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकालही लवकरच लागणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसई नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा (SSC) निकाल प्रलंबित होता. मात्र मंगळवारी दहावीचा निकाल घोषित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.