वीजबिल भरणा केंद्र आज, उद्या सुरू राहणार 

वीजबिल भरणा केंद्र आज, उद्या सुरू राहणार 

पुणे - थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा ग्राहकांना करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (ता. 28) आणि रविवारी (ता. 29) सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. 

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई पुणे परिमंडलात सुरू आहे. त्यामुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी- चिंचवड शहर तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र या दोन दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

याशिवाय घरबसल्या वीजबिल भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच मोबाईल ऍपद्वारे 'ऑनलाइन' सोय उपलब्ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com