पालिका उभारणार साडेनऊ हजार घरे

 पालिका उभारणार साडेनऊ हजार घरे

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेतंर्गत महापालिकेतर्फे शहरात एकूण १० गृहप्रकल्पात ९ हजार ४५८ परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ९३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आत्तापर्यंत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, रावेत आणि आकुर्डी येथील गृहप्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. तसेच, संबंधित प्रकल्पांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीची मंजुरी मिळाली आहे. 

योजनेतील चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, रावेत येथे होणाऱ्या गृहप्रकल्पांसाठी निविदा मागविल्या आहेत. आकुर्डी येथील गृहप्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. निविदा मागविलेल्या गृहप्रकल्पांचे काम पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू होणे अपेक्षित आहे. 
- प्रदीप पुजारी, कार्यकारी अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com