

पुणे : वाहतुक नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या वाहनांच्या आणि चालकांच्या नावांची यादी वाहतूक पोलिसांनी तयार केली आहे. सातत्याने नियमभंग करणाऱ्या दोनशे वाहनचालकांचा या यादीमध्ये समावेश करुन ही यादी वाहतुक पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बेदरकारपणे वाहन चालविण्यामुळे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मागील काही वर्षांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. हे प्रकार थांबावेत यासाठी वाहतुक पोलिसांकडून मागील पंधरा दिवसांपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे. विशेषतः सातत्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, वाहन चालविण्याचा परवाना देण्यास अटकाव करण्यापर्यंतची कारवाई पोलिसांनी केली आहे.
आता वाहतुकीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. नियमभंग करणाऱ्या दोनशे चालकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये एका वाहनचालकावर सर्वाधिक 32 खटले दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दंडाबाबतचा संदेश मोबाईलवर पाठवूनही काही वाहनचालकांनी दंड भरलेला नाही. अशा वाहनचालकांची नावे यादीमध्ये समाविष्ट केली आहेत. दंड न भरणारे शंभर वाहन चालक आहेत. पोलिसांनी punetrafficop.net या संकेतस्थळावर नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. नियमभंग करणाऱ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन आपल्या वाहनाचा क्रमांक टाकाव आणि दंडाची रक्कम भरावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.