ऑनलाइन कामे अवघी 25 टक्‍के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

पिंपरी - देशात डिजिटल इंडियाचा बोलबाला आहे. मात्र, शहरातील नागरिकांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) विभागातील कामे रांगेत उभी राहून करावी लागत आहेत. पीएफ कार्यालयात ऑनलाइन कामाचे प्रमाण अवघे २५ टक्‍के आहे. 

पिंपरी - देशात डिजिटल इंडियाचा बोलबाला आहे. मात्र, शहरातील नागरिकांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) विभागातील कामे रांगेत उभी राहून करावी लागत आहेत. पीएफ कार्यालयात ऑनलाइन कामाचे प्रमाण अवघे २५ टक्‍के आहे. 

महिन्याला पीएफच्या रकमेपोटी सहा कोटी रुपये जमा होतात. अनेक कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, अशी माहिती पीएफ कार्यालयाचे विभागीय आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी दिली. ऑनलाइन नोंदणीबरोबरच कर्मचाऱ्याने आपल्या आस्थापनेमध्ये पॅन क्रमांक आणि आधार कार्ड नंबरची जोडणी करणे आवश्‍यक आहे.कर्मचाऱ्यांनी दिलेली कागदपत्रे कंपनी व्यवस्थापनाने ती बरोबर आहेत की नाही, याची छाननी करून केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून ही माहिती पीएफ कार्यालयाला सादर करायची आहे.

१५ ऑगस्टपर्यंत पेपरलेस काम
पीएफ कार्यालयात असणाऱ्या दस्तऐवजाचे डिजिटलायझेशनचे काम १५ ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे नाव, आस्थापनेचा पत्ता, वय आदी माहिती एकत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर ही सर्व माहिती दिल्लीमधील सर्व्हरमध्ये टाकण्यात येणार आहे. दर महिन्याला फाइल करण्यात येणारे पीएफचे रिटर्न त्यांना भविष्यात ऑनलाइन फाइल करावे लागणार आहेत.

7 लाख पीएफ कार्यालयाकडे नोंदणीकृत कामगार
6 कोटी दर महिन्याला जमा होणारी रक्‍कम

कंपनी कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, म्हणून पीएफ कार्यालयाने कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. पीएफ कार्यालयातील अधिकारी कंपन्यांमध्ये जाऊन त्यासंदर्भात जनजागृती करत आहेत. येत्या काही दिवसांत हे अभियान अधिक व्यापक करण्यात येणार आहे. 
- अमिताभ प्रकाश, विभागीय आयुक्‍त, भविष्यनिर्वाह निधी कार्यालय, आकुर्डी

Web Title: PF office online work