पिंपरीत फायबरचे स्वच्छतागृह खाक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

पिंपरी - फायबरच्या स्वच्छतागृहाला अज्ञातांनी आग लावल्याने ते जळून खाक झाले. पिंपरी- काळेवाडी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ बुधवारी(ता. 3) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी काळेवाडी पुलाजवळ पोर्टेबल स्वच्छतागृह टेलरमध्ये ठेवण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाला अज्ञातांनी आग लावली. याची माहिती अग्निशामक दल व पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत हे स्वच्छतागृह जळून खाक झाले. तसेच जवळच लावलेल्या काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

Web Title: pimpri news fire kalewadi Sanitary