वल्लभनगर परिसरात धूरच धूर

वल्लभनगर परिसरात धूरच धूर

पिंपरी - वल्लभनगर येथील कचरा डेपोला गुरुवारी (ता. २९) सायंकाळी आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविले असले, तरी धूमसणाऱ्या आगीमुळे परिसरात धूरच धूर झाल्याचे दिसून येते.

वल्लभनगर येथील खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोला गुरुवारी सायंकाळी आग लागली होती. या आगीवर खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाने नियंत्रण मिळविले. मात्र आजही ही आग धूमसत असल्याने आसपासचा परिसर आणि पुणे-नाशिक महामार्गावर धूरच धूर दिसत आहे. यामुळे चालकांना वाहन चालविताना अडचणी येत आहेत.

याबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, कचरा डेपोत माध्यमांच्या प्रतिनिधीला प्रवेश देऊ नका, अशा सूचना कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी येथील सुरक्षारक्षकांना दिल्या आहेत. एकीकडे धूमसणाऱ्या आगीमुळे नागरिकांना धुराचा त्रास होत आहे, तर दुसरीकडे कॅंटोन्मेंट बोर्डाचे अधिकारी साप्ताहिक सुटीवर असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. माध्यमांना प्रतिक्रियेसाठी मोबाईल क्रमांक देण्यासही बंदी केल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाचे दोन बंब आणि दोन टॅंकर येथील आगीवर चार दिवसांपासून पाणी मारत असून, अद्यापही हा परिसर धुरात दिसेनासा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com