चिंचवडमध्ये उद्यापासून ऑटो एक्‍स्पो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन हॉलमध्ये नव्या मोटारींचे दोन दिवसांचे प्रदर्शन 

पिंपरी - स्वतःच्या मालकीची कार असावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने शनिवारपासून (ता.१२) ‘ऑटो एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. कार घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. शिवाय वेगवेगळ्या गाड्यांच्या फिचर्समुळे बरेचजण कोणती कार घ्यावी, या संभ्रमात असतात. कार खरेदीबाबतचे गैरसमज आणि ग्राहकांच्या मनातील सर्व संभ्रम दूर करून त्यांना मनासारखी कार खरेदी करता यावी यासाठी ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ‘ऑटो एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. 

कार घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या फिचर्सची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात; तेव्हा खऱ्या अर्थाने कार घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. या ‘एक्‍स्पो’मध्ये होंडा कार्स, बी. यू. भंडारी वोक्‍सवॅगन, पिंपरी- चिंचवड, शरयू टोयोटा, विराज स्कोडा, शिव निस्सान, माय कार मारुती आदी कंपन्या सहभागी आहेत. या कंपन्यांच्या गाड्यांची माहिती येथे मिळणार आहे. त्यांच्या किमती आणि ईएमआय संबंधित प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी मिळतील. 
 
ऑटो एक्‍स्पोबाबत... 
कुठे - ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर, सायन्स पार्कजवळ, चिंचवड 
कधी - १२ आणि १३ ऑगस्ट २०१७ 
केव्हा - सकाळी ११ ते संध्याकाळी ७
प्रवेश व पार्किंग मोफत