अडीच वर्षांच्या चिमुरड्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नवी सांगवी - खासगी शिकवणीच्या शिक्षिकेने अडीच वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण करण्याची घटना पिंपळे गुरव येथे सोमवारी (ता. ११) घडली. 

नवी सांगवी - खासगी शिकवणीच्या शिक्षिकेने अडीच वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण करण्याची घटना पिंपळे गुरव येथे सोमवारी (ता. ११) घडली. 

देव संतोष कशप्पा (रा. पिंपळे गुरव) असे या चिमुरड्याचे नाव आहे. देव याचे वडील मजुरी करतात. तर आई घरकाम करते. मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी पोटाला चिमटा घेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. तसेच खासगी शिकवणीही लावली. देव हा सोमवारी दुपारी चार वाजता शिकवणीला गेला. सायंकाळी सहा वाजता परत आल्यावर देव याला अमानुष मारहाण झाल्याने निदर्शनास आले. यामुळे त्यांच्या पालकांनी सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता चिठ्ठी दिली. तसेच उपचाराचे मेडिकल रिपोर्ट आल्यावर गुन्हा दाखल करू असे सांगितले. ते मुलाला घेऊन रुग्णालयात गेले असता त्यांनी पुण्यातील ससून रुग्णालयास जाण्यास सांगितले. तिथे त्यांच्यावर उपचार करून घरी सोडले. अद्यापही त्याच्या चेहऱ्यावर व अंगावर मोठ्या प्रमाणात सूज आहे. जखमी बालकावर प्रथम उपचार होणे गरजेचे असल्याने चिठ्ठी देऊन उपचाराकरिता पाठविले. मात्र उपचारानंतर ते पुन्हा तक्रार देण्यासाठी आलेच नाहीत. ते आल्यास तक्रार घेऊ, अशी माहिती पोलिसांनी दिली.