‘सिमॅसेस’ अभ्यासक्रमातून मिळणार नवी दिशा

डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी आणि रिसर्च महाविद्यालय, पिंपरी : ‘सकाळ’च्या ‘सिमॅसेस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ अभ्यासक्रमासंदर्भात आयोजित कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी.
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी आणि रिसर्च महाविद्यालय, पिंपरी : ‘सकाळ’च्या ‘सिमॅसेस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ अभ्यासक्रमासंदर्भात आयोजित कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी.
Updated on

पिंपरी - येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि रिसर्च महाविद्यालयात ‘सिमॅसेस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे नवी दिशा मिळणार असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

उद्योजक घडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी) आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) यांच्यातर्फे ‘सिमॅसेस लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ अभ्यासक्रम ऑक्‍टोबरमध्ये सुरू होत आहे. याची माहिती देण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. प्राचार्य डॉ. सोहन चित्तलांगे, समन्वयक प्रा. मारुती शेलार, एसआयएलसीचे सीईओ देबासिस बिस्वास उपस्थित होते.

तरुणांमधून उद्योजक घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे मत प्राचार्य डॉ. चित्तलांगे यांनी व्यक्त केले. तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा कसा आहे, हे बिस्वास यांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोर्सची माहिती दिली. या कार्यशाळेला फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

विद्यार्थ्यांच्या मते...
शिक्षण पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरवात केल्यावर विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळणे जरा कठीण असते. त्या वेळी व्यावसायिक जीवनाला नवी दिशा देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
- रूपाली हंडाळ

‘सकाळ’च्या वतीने आयोजित कार्यक्रमा-मुळे चांगली दिशा लाभली आहे. विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे उद्योजक बनण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली आहे.
- ऋतुजा पांढरे 

मार्गदर्शन कार्यशाळेमुळे कमी पैशात उत्तम उद्योजक बनण्याचे प्रशिक्षण ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिले आहे, हे अभिनंदनीय आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात सहभाग घ्यावा.
- ऐश्‍वर्या गणेश 

‘सकाळ’ने विद्यार्थ्यांसाठी नियमित कॉलेज-बरोबरच वेळेत पूर्ण करता येईल, असा उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे कमी दिवसात आणि कमी शुल्कात.
- श्‍याम भालेराव  

यावर्षी माझा अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या दिवसात या अभ्यासक्रमाचा मोठा फायदा आम्हाला होणार आहे. शुल्क कमी असल्याने सगळ्यांना प्रवेश मिळू शकेल.
- अक्षय काकडे  

अभ्यास-क्रमाचा कालावधी कमी असल्याने विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे. ‘सकाळ’चा हा अभ्यासक्रम सगळ्यांनाच परवडणार आहे. आम्ही दिवसाला दहा रुपये खर्च करू शकतो.
- अभिलाष कनकधर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Accommodation, food, sanitation and rain-related arrangements have been strengthened to facilitate thousands of Warkaris.
Savitribai Phule Pune University announced the revised schedule to ensure that candidates do not miss the SET examination.
Major Pune Roads to Close this Thursday
The victim's family alleged that they received inadequate support from the administration during the search operation.
Marathi News Esakal
www.esakal.com