बाबासाहेब पुरंदरेंनी घेतली पंतप्रधानांची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

या भेटीचे वर्णन करताना मोदी यांनी म्हटले आहे की, "बाबासाहेब पुरंदरे यांना भेटून मला खूप आनंद झाला आहे. बाबासाहेब हे एक अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना अनेक वर्षे मी व्यक्तिशः ओळखत आहे.''

पुणे : महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन दिग्गजांची भेट मंगळवारी दिल्ली येथे झाली.

या भेटीनंतर आपल्याला बाबासाहेबांविषयी काय वाटले, हे पंतप्रधानांनी ट्‌विट करून स्वतः सर्वांपर्यंत पोचवले. मोदींनी या भेटीची काही छायाचित्रेही आपल्या ट्‌विटर अकाउंटवर शेअर केली आहेत.

या भेटीचे वर्णन करताना मोदी यांनी म्हटले आहे की, "बाबासाहेब पुरंदरे यांना भेटून मला खूप आनंद झाला आहे. बाबासाहेब हे एक अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना अनेक वर्षे मी व्यक्तिशः ओळखत आहे.'' आपल्या वर्षानुवर्षांच्या अथक कार्यातून बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्कार्य नव्या पिढ्यांपर्यंत पोचवले आहे, असे गौरवोद्‌गारही मोदींनी काढले.