

वाघोली : पी एम आर डी ए अंतर्गत संपूर्ण जिल्हा असल्याने एका गावाला निधी देण्यासाठी मर्यादा आहेत. यामुळे ग्रामपंचायतीने उत्पनाचे साधन वाढवून विकास केला पाहिजे. असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. निधी देऊ मात्र टप्याटप्याने व कामाची गरज पाहून देऊ असेही त्यांनी स्पस्ट केले.
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या माध्यमातून वाघोलीतील 1300 मीटर पुणे नगर राष्ट्रीय महामार्गा रुंदीकरण कामाचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार बाबुराव पाचर्णे, आयुक्त किरण गित्ते, बबनराव पाचपुते, सरपंच वसुंधरा उबाळे, संदीप सातव, रामदास दाभाडे, रोहिदास उंदरे, दादा सातव, गणेश कूटे, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्तीत होते.
बापट पुढे म्हणाले, नागरिकांनी सुद्धा स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे. सर्वांच्या सहभागाशिवाय प्रश्न सुटत नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वॉर्डनची गरज आहे. ते वॉर्डन उपलब्ध करून देण्याची आपलीच जबाबदारी आहे. अतिक्रमणे काढावी लागणार आहेत. या सर्व कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. या वेळी रस्ता रुंदीकरण व अन्य कामासाठी पाठपुरावठा करणाऱ्या तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व्हाट्सउप ग्रुप च्या माध्यमातून मदत करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला. कृष्णकांत सातव यांनी प्रास्ताविक केले. हिरामण सातव यांनी सूत्र संचालन केले.
224 कोटी मंजूर
केंद्र सरकारच्या भारतमला योजनेच्या कामाला वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे वाघोली ते शिक्रापूर दरम्यान लेन वाढविण्यासाठी राज्य सरकारने 224 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र त्यासाठी केंद्र सरकारच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज आहे. ती काही दिवसात मिळेल. अशी माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.
कामाचे तीन भाग
वाघोलीतील तीन चौकाचे रुंदीकरण काम सुरू करण्यात आले आहे. भावडीरस्ता ते लोणीकंद दरम्यान बायपास तसेच बी जे एस कॉलेज ते खराडी दरम्यान रस्त्याचे नियोजन आहे. ही तिन्ही कामे झाल्यास वाघोळीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल. तसेच स्मार्ट सिग्नल सिस्टिम कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असणार आहे. वाघोलीतील अतिक्रमणे तसेच नैसर्गिक नाले ओढे बुजविण्यात आले आहे. ते अतिक्रमण काढणार आहे. या सर्व कामासाठी
नागरिकांच्या मदत गरजेची आहे. सध्याचे रुंदीकरण काम
चार महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. अशी माहिती पी एम आर डी ए चे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
पालकमंत्र्यांवर नाराजीचा सूर
वाघोलीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल पी एम आर डी ए ला मिळतो. त्यातून किमान 50 टक्के रक्कम तरी गावच्या विकासासाठी दिला पाहिजे. मात्र पालकमंत्री यांनी निधी देण्याला मर्यादा असल्याचे सांगून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याचा सल दिला. उत्पन्न कसे वाढवायचे असा प्रश्न उपसरपंच संदीप सातव व काही युवकांनी उपस्तीत करून त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
अन पालकमंत्र्यांनी हात जोडले
वाघोलीच्या पाणी योजनेसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खर्चाच्या 30 टक्के रक्कम ग्रामपंचायतीने द्यावी असे प्राधिकरणाने सांगितले होते. ती रक्कम सुमारे 8 कोटी रुपये असल्याने तेवढी देता येणार नाही आम्ही दोन कोटी रुपये देऊ असे माजी सरपंच रामदास दाभाडे यांनी सांगताच बापट यांनी हात जोडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.