डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

डेक्कन क्वीन ही नेहमी फलाट क्रमांक 1 वरूनच सुटत होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून ती फलाट क्रमांक 5 वरून सुटत आहे. त्यामुळे प्रवाशांनी हे आंदोलन केले.

पुणे - पुण्याहून मुंबईकडे धावणारी डेक्कन क्वीन आज (सोमवार) सकाळी प्रवाशांनी रोखून धरल्याने एक तास उशीराने धावली. पुणे स्टेशनवर फलाट क्रमांक 1 वर गाडी लावण्यासाठी प्रवाशांनी आंदोलन केले.

दररोज सकाळी सव्वासात वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन आज प्रवाशांच्या आंदोलनामुळे आठनंतर निघाली. आज सोमवार असून, अनेक चाकरमान्यांची कामाला निघण्यासाठी गडबड असते. त्याचवेळी प्रवाशांनी हे आंदोलन केल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.

डेक्कन क्वीन ही नेहमी फलाट क्रमांक 1 वरूनच सुटत होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून ती फलाट क्रमांक 5 वरून सुटत आहे. त्यामुळे प्रवाशांनी हे आंदोलन केले.

टॅग्स