पुणे: उरूळीकांचनजवळ महिलेवर गाडीमध्ये सामुहिक बलात्कार

जनार्दन दांडगे
शनिवार, 17 जून 2017

महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. महिलेला घरी येण्यासाठी रात्री उशिर झाल्याने पारगाव चौफुला येथे उभी होती. यावेळी त्या ठिकाणी फॉर्चूनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटामध्ये नेऊन बलात्कार केला व नंतर घाटामध्ये सोडून दिले.

पुणे - उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. महिलेला घरी येण्यासाठी रात्री उशिर झाल्याने पारगाव चौफुला येथे उभी होती. यावेळी त्या ठिकाणी फॉर्चूनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटामध्ये नेऊन बलात्कार केला व नंतर घाटामध्ये सोडून दिले.

महिलेने घाटमधून प्रवास करणाऱ्या दोन दुचाकीस्वरांच्या मदतीने फॉर्चूनर गाडीचा नंबर मिळविला. तसेच लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.