पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू

दत्ता म्हसकर
रविवार, 2 जुलै 2017

जुन्नरच्या आदिवासी भागात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून भात खाचरात भात लावणीची कामे सुरु झाली आहेत.

जुन्नर (जि. पुणे) : जुन्नरच्या आदिवासी भागात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून भात खाचरात भात लावणीची कामे सुरु झाली आहेत.

आदिवासी भागातील भात हे मुख्य पीक असून सुमारे 12 हजार हेक्‍टर क्षेत्रात भात लागवड केली जाते. पांरपरिक व आधुनिक पद्धतींद्वारे भात लावणी केली जाते. यंदाच्या वर्षी पाऊस समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वेळेत झालेल्या पावसामुळे भात लागवडही वेळेवर होत आहे. घाटघर, अंजनावळे, आंबोली, भिवाडे, आंबे, हातवीज आदी परिसरातील शेतकरी भात लावणीच्या कामात गुंतले आहेत. अचानक दाटुन येणारे धुके, कोसळणारा पाऊस व भात खाचरातील पाण्यात चिखलात उभे राहून भात रोपे लावण्यात मग्न असलेले शेतकरी असे चित्र या भागात पहावयास मिळत आहे.

टॅग्स