'सोवळे प्रकरणा'वरून पुण्यात मराठा बहुजन मोर्चा निघणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

या साऱ्या घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केला आहे.

पुणे : सोवळे मोडले म्हणून महिलेविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणणाऱ्या हवामान खात्याच्या महासंचालिका डॉ. मेधा खोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावे, या मागणीसाठी मराठा बहुजन समाजाच्यावतीने येत्या 25 सप्टेंबरला पुण्यात "एल्गार मोर्चा' काढण्यात येणार आहे. 

हवामान खात्यातील आपल्या पदाचा दुरूपयोग करून पोलीस यंत्रणेचा डॉ. खोले यांनी गैरवापर केला. त्या आधारे घरकाम करणाऱ्या यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस यंत्रणेस भाग पाडले. साऱ्या सामाजाचा दबाव लक्षात आल्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली. या साऱ्या घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केला आहे. या साऱ्या प्रकरणात आता कनिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांचा बळी दिला जाण्याची शक्‍यता असून मूळ आरोपी असलेल्या डॉ. खोले यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. 

याबाबत दोषींना शासन होण्यासाठी येत्या 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता लाल महालापासून सुरू होणारा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. केवळ मराठा-बहुजन नव्हे तर वर्ण वर्चस्वाच्या विरोधात लढणाऱ्या सर्वच संस्था, संघटना या मोर्चात सहभागी होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

'सरकारनामा'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
आता रत्नाकर गायकवाडही झाले पुणेकर! 
पिंपरीचे दोन्ही भाजप आमदार सेफ
दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा चक्‍का जाम 
शिवसेनेवर आरोप करणारे गोट्या खेळत कोठे बसले आहेत ? - उद्धव ठाकरे 
मी "सरकारी' साधू नाही; "असर'कारी साधू : योगगुरू बाबा रामदेव 
आजचा वाढदिवस : खासदार अनिल शिरोळे 
भगवान गडाची कन्या यंदा रुसली कशी?
शिवसेनेवर आरोप करणारे गोट्या खेळत कोठे बसले आहेत...