मेट्रोच्या वाढीव मार्गाचा सर्वंकष अहवाल करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

पुणे - ‘महामेट्रो’ने हाती घेतलेल्या दोन्ही मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढीव मार्गाचा ‘डीपीआर’ (सर्वंकष प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम हाती घ्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी महामेट्रो कंपनीची स्थापन केली आहे. दळवी यांनी आज दीक्षित यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग पिंपरी-चिंचवड येथील भक्ती-शक्ती शिल्पापर्यंत वाढविण्याची गरज आहे; तर वनाज ते रामवाडी येथील मार्ग रामवाडीच्या पुढे वाघोलीपर्यंत वाढविण्याची गरज आहे, अशा सूचना दळवी यांनी महामेट्रोला केल्या आहेत.

या संदर्भात दळवी म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्याचे काम मार्गी लागत असताना दुसऱ्या टप्प्यात हे मार्ग पुढे वाढविण्यासंदर्भात दीक्षित यांच्याशी चर्चा झाली आहे. या वाढीव मार्गांचे सर्वेक्षण करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे आदी कामांना वेळ लागू शकतो. पहिल्या मार्गाचे काम मार्गी लागेपर्यंत दुसऱ्या मार्गाची ही कामे पूर्ण होऊ शकतात. त्यानंतर त्यास मान्यता घेऊन त्यांचे काम सुरू करणे सोयीचे ठरले. रामवाडीपर्यंतचा मेट्रो मार्ग पुढे वाघोलीपर्यंत वाढविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आतापासून तयारी केल्यास सर्व संबंधित विभागांना एकत्र येऊन हे काम वेळेत मार्गी लावणे शक्‍य 
होऊ शकते.’’