वारज्याच्या जखमी गिर्यारोहकाला लेहमधून आज चंडीगडला आणणार

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुख्यमंत्री कार्यालयाकडून नातेवाईकांना माहिती दिली 

वारजे माळवाडी : येथील गिर्यारोहक पद्मेश पांडुरंग पाटील (वय 33) 15 ऑगस्ट रोजी लेह येथे गिर्यारोहण करताना दरीत पडला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. परंतु तेथील हवामान चांगले नसल्याने त्याला उपचारासाठी अन्यत्र हलवावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासाठी हवाई रुग्णवाहिकेची गरज होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती व्यवस्था केली असून त्याला आज (शुक्रवारी) चंदिगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे फोनवरून सांगण्यात आल्याचे पद्मेशचे वडील पांडुरंग पाटील यांनी सांगितले.

पद्मेश हा 8 ऑगस्ट रोजी या ट्रेकसाठी लेह परिसरात गेला होता. 15 ऑगस्ट रोजी दुपारी तो पडला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचा त्याचा मित्राचा फोन आला होता. परंतू त्यानंतर संपर्क होऊ शकला नाही. 16 ऑगस्ट रोजी संपर्क झाला असता त्याला येथील ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. हवामान खराब असल्याने येथे पुढील उपचार होणार त्यासाठी त्याला अन्यत्र हलवावे लागणार आहे. त्यासाठी हवाई रुग्णवाहिका पाहिजे असे त्यांनी कळविले. 

वडिलांची सकाळ फेसबुक पेजच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे हवाई रुग्णवाहिकेची मागणी केली तो व्हिडिओ -

माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी सांगितले की,  पदमेशचा वडिलांनी मला 16 ऑगस्टला सांगितले. मी तातडीने खासदार अनिल शिरोळे यांना संपर्क साधला. त्यांनी त्याची अधिक माहिती मागवून वरिष्ठ पातळीवर माहिती देऊन मदत करण्याचा मेल केला. त्यानुसार, हवाई रुग्णवाहिका देण्याची मागणी राज्याचे सहसचिवांनी दिल्ली तीळ संरक्षण विभागतील हवाई दलाच्या सहसचिवास पत्राद्वारे केली. दरम्यान आमदार भीमराव तापकीर यांनी मुख्यमंत्रीयांची भेट घेऊन तर शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर, सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना संपर्क साधला. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनि देखील सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली होती. त्यानुसार, हवाई रुग्णवाहिका मिळाली. त्याला उदा सकाळी चंदीगड येथे आणणार आहेत. नगरसेवक सचिन दोडके यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने खासगी हवाई रुग्णवाहिका आरक्षित केली आहे. त्यासाठी धनादेश देखील भरला आहे. पद्मेश याचा भाऊ पंकज बरोबर दोडके रात्री चांदीगडला रवाना झाले आहेत. 

हवाई दलाने केली मोलाची मदत
घटनेची माहिती मिळताच लेह येथील स्थानिक प्रशासनाने लष्कराला मदत करण्यास सांगितले. त्यांनी तातडीने 18 हजार फूट ठिकाणिबर्फाच्या डोंगर उतारावर अशा हेलिकॉप्टर उतरलं आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. तो चार पाच तास तेथे पडला होता. अशी माहिती त्याचा भाऊ व वडिलांनी सकाळला दिली.