प्लॅस्टिकपासून पाईप

प्लॅस्टिकपासून पाईप

पुणे - प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन, पिशव्या, कप अशा विविध प्रकारच्या वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन करुन त्याच्यावर पुर्नप्रक्रिया केली जाते. यात प्लॅस्टिकचे मोठे-मोठे गठ्ठे बनवून ते इंदौर, मालेगाव अशा विविध ठिकाणी असणाऱ्या कंपन्यांना पाठविला जातात. यापासून मजबूत आणि टिकाऊ पाईप बनविण्यात येतात. याप्रकारे शहरातून दररोज संकलित होणाऱ्या ६० टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे, असे कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार ललित राठी यांनी सांगितले.

शहरात दररोज जवळपास १०० कोटी प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो. त्यातील केवळ ६० टक्के कचरा संकलित होतो, उर्वरित ४० टक्के कचरा अपुऱ्या माहितीअभावी इतरत्र पडलेला दिसतो किंवा जाळला जातो. 

राठी म्हणाले,‘‘धायरी परिसरात दररोज जवळपास २५ टन सुका कचरा जमा होतो. 

त्यातील ५ ते ६ टन हा प्लॅस्टिक कचरा असतो. यात प्लॅस्टिकच्या खुर्च्या, चप्पला, दुधाच्या पिशव्या, कॅरिबॅग, ड्रम अशा स्वरुपाचा कचरा असतो. हा कचरा ‘रिप्रोसेसिंग’ करण्यासाठी कुदळेवाडी, कात्रज परिसरातील कंपन्यांकडे पाठविला जातो. या कंपन्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करुन त्यांचे गठ्ठे बनवितात. हे गठ्ठे इंदौर, मालेगाव येथील कंपन्यांकडे पाठविले जातात आणि त्यापासून पाईप बनविला जातो.’’

संपूर्ण शहरात दररोज एक कोटी १० लाख रुपयांच्या प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया होते. हा कचरा उचलला गेला तर त्यावर पुनर्प्रक्रिया करणे सोयीस्कर होते. त्यामुळे हा कचरा संकलनासाठीची यंत्रणा अधिक सक्षम असायला हवी, असा पर्याय राठी यांनी सूचविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com