नोटाबंदीनंतर कॅशलेसद्वारे रेल्वेला 19 कोटींचे उत्पन्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे - नोटाबंदीनंतर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल 19 कोटी 41 लाखांचे उत्पन्न कॅशलेसच्या माध्यमातून मिळाले आहे. त्यासाठी पुणे विभागाच्या वतीने 47 रेल्वे स्थानकांवर तब्बल 131 पीओएस मशिन्स लावल्या. परिणामी गेल्या अकरा महिन्यांत रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणावर कॅशलेसकडे वळाले असल्याचे समोर आले आहे. 

गेल्या वर्षी आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बंद झाल्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण देशभरात विविध क्षेत्रांमध्ये रोखीने व्यवहार करताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. रेल्वे विभागालाही याचा मोठा फटका बसताना दिसला होता. प्रवाशांना सुट्या पैशांअभावी अनेकदा तिकीट खिडकीवर वाद घालावा लागत होता. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाने कॅशलेसच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलून तिकिटापासून पार्किंगचे पैसेही कॅशलेस पद्धतीने देता येतील, अशी यंत्रणा उभी केली. त्यासाठी आपल्या विभागातील 47 स्थानकांवर पीओएस मशिन्स लावल्या. गेल्या अकरा महिन्यांत दोन लाख प्रवाशांनी कॅशलेस सुविधेचा लाभ घेतला आहे. या प्रवाशांकडून रेल्वेला 11 कोटी 65 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे, तर पार्सल विभागामध्ये 11 हजार 300 पार्सलच्या वाहतुकीतून 7 कोटी 76 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 2015-16 या आथिॅक वर्षात पुणे विभागाला कॅशलेस व्यवहाराद्वारे मिळालेले उत्पन्न अवघे एक कोटी रुपये होते. या कालावधीत 15 हजार 730 प्रवाशांनीच कॅशलेस सुविधेचा लाभ घेतला होता. 

Web Title: pune news Railways generated Rs. 19 crores through cashless