‘शिवनेरी’तर्फे उद्या राज्यसेवा मॉक टेस्ट

‘शिवनेरी’तर्फे उद्या राज्यसेवा मॉक टेस्ट

पुणे - राज्यसेवेत दाखल होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रविवारी (ता. ४) संपूर्ण राज्यात राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर मॉक टेस्ट होणार आहे. शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने होणारी ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची आहे. या टेस्टसाठी राज्यभरातल्या उमेदवारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 

उमेदवारांच्या आग्रहावरून नावनोंदणीसाठी ऑनलाइन लिंक सुरू ठेवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ही परीक्षा इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल, लॅपटॉप किंवा अन्य संगणकावरून देता येईल, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक शुभंकर कणसे यांनी दिली.

या मॉक टेस्टमध्ये राज्यसेवेच्या पेपर १ व २ या दोन्ही पेपरची ऑनलाइन चाचणी होईल. पेपर १ मध्ये सामान्यज्ञानाचा भाग असून प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्न असतील. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेतील पेपर २ मध्ये प्रत्येकी अडीच गुणांचे ८० प्रश्न असतील. म्हणजे हा पेपर दोनशे गुणांचा असेल. दोन्ही पेपरकरिता आयोगाप्रमाणेच नकारात्मक गुणदान पद्धत असणार आहे.

विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्यासाठी गुगल क्रोमवरून शिवनेरी पब्लिकेशनच्या www.shivneripublications.in या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. मॉक टेस्ट रजिस्ट्रेशनवरती क्‍लिक करावे. फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल व पत्ता बिनचूक भरून तो सबमिट करावा.

अचूक फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ त्यांच्या ई-मेल, व्हॉटस्‌ॲपवर कळविली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सकाळ विद्या’ व ‘शिवनेरी फाउंडेशन’मार्फत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विविध सुविधा पुढील दोन वर्षे पुरविल्या जातील. या मॉक टेस्टमधील गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com