पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

वडगाव पोलिसांनी याप्रकरणी वसंत गोपाळ सातकर (वय 42) याला ताब्यात घेतले आहे. त्याने पत्नी व मुलगा यांची गळा चिरून हत्या केली. तर मुलगी व अन्य एकजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे : मावळ तालुक्यातील कान्हे येथे आज (सोमवार) पहाटे दोनच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नी व मुलाचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी व अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत.

वडगाव पोलिसांनी याप्रकरणी वसंत गोपाळ सातकर (वय 42) याला ताब्यात घेतले आहे. त्याने पत्नी व मुलगा यांची गळा चिरून हत्या केली. तर मुलगी व अन्य एकजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजनीचा भाऊ गणेश नाना मावकर (रा.तुंगार्ली, लोणावळा) याने फिर्याद दिली आहे.

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचे अन्य व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा वसंतला संशय होता. यावरून यापूर्वी त्याने भांडणही केले होते. याच कारणावरून त्याने सोमवारी पहाटे हे कृत्य केले. पोलिस निरीक्षक प्रदिप काळे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स