स्नेहवनच्या मुलांबरोबर रोझलँण्ड सोसायटीने साजरा केला पितृदिन

sangavi
sangavi

नवी सांगवी (पुणे) : पितृदिनाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील रोझलँण्ड सोसायटीच्या वतीने सायकल दान हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भोसरी येथील ' स्नेहवन ' या संस्थेतील मुलांना जुन्या परंतु वापरात असलेल्या पंधरा सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी दुसरी ते दहावी या इयत्तेत शिकणारी पंचवीस मुलांना खाऊ वाटपही करण्यात आले. तसेच या मुलांनी सोसायटीच्या बागेत खेळण्याचा आनंदही लुटला.

स्नेहवन ही दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर शेतमजूर व ऊसतोड कामगारांच्या मुलांचा सांभाळ करणारी संस्था आहे. अशा रंजल्या गांजल्या मुलांबरोबर रोझलँण्डच्या सभासदांनी पितृ दिन साजरा केला. सोसायटीचे चेअरमन संतोश मस्कर यांनी सोसायटीतील सभासदांना लहान मुलांच्या जुन्या सायकली दान करण्याचे आवाहन केले होते. सभासदांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पंधरा सायकली जमा केल्या व संस्थेचे विश्वस्त अशोक देशमाने यांच्याकडे स्वाधिन केल्या. यावेळी नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनीही रूपये अकरा हजारांचा चेक स्नेहवन करीता दिला. स्वतः म्हसकर व व्ही राममुर्ती यांनी पाच पाच हजार तर रमाकांत वाघुळदे यांनी अडिच हजार व इतरांचे असे एकून पंचवीस हजार यावेळी स्नेहवनला देण्यात आले. 

स्नेहवनचे विश्वस्त अशोक देशमाने यांनी आपल्या परभणी या गावी डॉ. प्रकाश आमटेंचा 'स्वरानंदवन' हा कार्यक्रम बघितला होता. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन देशमाने डॉ. आमटेंना पुण्यात भेटले ही... आणि विं दां करंदीकरांच्या ' देणाऱ्याने देत जावे... ' ओळी प्रमाणे त्यांनी डॉ. आमटेचे हात घेत भोसरी येथे अशा दुःखी कष्टी मुलांकरीता स्नेहवन संस्था सुरू केली. देशमानेंची धर्मपत्नी अर्चनाताई याही दररोज तीस मुलांचा स्वयंपाक एकट्याने करून सासु सासऱ्यांचीही सेवा करीत आहेत. याप्रसंगी आनंद दप्तरदार, एस कृष्णा , सिध्दार्थ नाईक व सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com