आरटीओ कार्यालयात कामाशिवाय थांबू नका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पिंपरी - येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीची स्वच्छता ठेवण्याकडे लक्ष दिले जात आहे. तसेच, कामाशिवाय जास्त वेळ कोणी थांबणार नाही, इमारतीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मोशी- प्राधिकरणातील प्रशस्त इमारतीत काही महिन्यांपूर्वी स्थलांतरित झाले आहे. या कार्यालयांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्‍यांचा समावेश होतो. त्यामुळे वाहनचालक, मालक व त्यांच्या सोबत येणाऱ्यांमुळे कार्यालयात नेहमीच गर्दी असते. मात्र, अनेक जण बेशिस्तपणे वागतात. पान, तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे इमारतीच्या खिडक्‍या रंगल्या आहेत. गेल्या आठवड्यात एक जण चक्क लोखंडी बाकावर झोपलेला आढळला. दोन जण खिडकीत बसलेले होते. याबाबत आरटीओ कार्यालय म्हणजे ‘गप्पा, टप्पा आणि खुशाल झोपा’ असे वृत्त गुरुवारी (ता. ३१) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेतली असून इमारतीची स्वच्छता व देखभालीकडे लक्ष दिले जात असल्याचे सांगितले. 

आरटीओचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी थेट कार्यालयात येण्याची आवश्‍यकता नाही. तरीही काही जण कामानिमित्त येतात. त्यांच्यासोबत येणारे काही असतात. अशा लोकांवर लक्ष ठेवले जात आहे. 
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
 
Web Title: sakal news impact Do not stop without getting into the RTO office