पुणे - सांगवी स्मशानभूमीत अखेर निवारा

रमेश मोरे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील स्मशानभूमीत पालिका प्रशासनाकडुन अखेर निवारा शेड बांधण्यात आल्याने सांगवीकरांच्या अडचणी कमी झाल्या आहेत.

जुनी सांगवी येथील स्मशानभुमीचे काम गेली तीन वर्षापासुन संथ गतीने सुरू होते. या ना त्या कारणांमुळे रखडत सुरू असलेल्या कामामुळे सांगवीकरांना राडा रोडा, अंत्यविधी व इतर धार्मिक विधींसाठी ऊन, वारा, पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. येथील स्मशानभुमी नुतनिकरण कामात घाट परिसराच्या नविन पायऱ्या, मुख्य दहन बांधकाम व निवारा शेड अशी कामे होती.

यातील मुख्य दहन विधी बांधकाम, निवारा पत्राशेड, नदी घाटावरील पायऱ्यांचे काम पूर्ण झाल्याने नागरीकांच्या अडचणी सुटल्या आहेत. नागरीकांमधुन याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. येथील विद्यमान नगरसेवकांनी सत्तांतरानंतर नागरीकांची अडचण लक्षात घेता प्रशासनाकडे काम पावसाळ्याआधी पूर्ण करण्याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तर येथील मनसेच्या वतीने वेळोवेळी नागरीकांच्या तक्रारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मांडल्या होत्या. याच बरोबर पावसाळ्याआधी निवाराशेड व इतर सुविधा पूर्ण करण्या बाबत आंदोलन उपोषणाचा इशारा मनसेच्या राजु सावळे यांच्याकडुन देण्यात आला होता.

 पावसाळ्या आधी निवाराशेडचे काम पुर्ण करावे याबाबत पालिका प्रशासनाकडे प्रभागातील नगरसेवकांनी पाठपुरावा केला होता.शिल्लक राहिलेली कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

- शारदा सोनवणे

एका वर्षात काम पुर्ण होणे अपेक्षित असताना या कामाला तब्बल तीन वर्ष लागली.नागरीकांना या काळात अडचणींचा सामना करावा लागला. निवारा व्यवस्था झाल्याने नागरीकांचे प्रश्न सुटले आहेत

- राजु सावळे

Web Title: shade for sangavi graveyard