स्वाइन फ्लू लसीची कमतरता

Swine-Flu
Swine-Flu

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस अपुरी पडते. अन्य महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेसा साठा असून, गरोदर माता व उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णांना दिली जात आहे. शनिवारी ‘सकाळ’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ही बाब समोर आली. 

शहरात सध्या स्वाइन फ्लूबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण आणि मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अतिजोखमीच्या रुग्णांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस विनामूल्य उपलब्ध आहे; तसेच गरोदर मातांनाही लस उपलब्ध करून दिली आहे. चिंचवडगाव येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात रोज सरासरी १५ ते २० जणांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. 

सध्या रुग्णालयात १२५ लस (डोस) उपलब्ध आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून येथे पुरेसा साठा असल्याची माहिती ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वीणादेवी गंभीर यांनी दिली. 

पिंपरी येथील जिजामाता रुग्णालय आणि काळेवाडी, भाटनगर, पिंपळे सौदागर व पिंपरी वाघेरे येथील दवाखान्यांसाठी २५० लसीचा साठा सध्या शिल्लक आहे, अशी माहिती जिजामाता रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमणी यांनी दिली. येथे रोज सरासरी १० ते १५ जणांना ही लस दिली जात आहे. 

पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सध्या ६० लस उपलब्ध आहे. येथे रोज सरासरी ४० रुग्णांना लस दिली जाते.

महापालिका रुग्णालयांमध्ये सध्या स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अतिजोखमीचे रुग्ण, गरोदर माता, उच्च रक्तदाब व मधुमेही रुग्णांना प्रामुख्याने ही लस दिली जात आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com