पुण्यात निघणार 'जातीयवादाची अंत्ययात्रा'... 

bharatiya
bharatiya

चलो अलका चौक 

विषय :
दिनांक ४/१/२०१८
ठिकाण : अलका चौक
वेळ : सायंकाळी ५ वाजता 

एकीकडे जग अंतराळात गणित विज्ञानाच्या बळावर भराऱ्या मारत असताना दुसरीकडे आपल्या भारतात, महाराष्ट्रात मात्र इतिहास, भाषा, प्रांत यावरुन एकमेकांची डोकी फोडण्याच्या घटना घडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज , लोकमान्य टिळक, महात्मा गांधी , पंडीत नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, सुखदेव, भगतसिंग अशी कितीतरी मंडळी हि आपली राष्ट्रीय ठेवा व प्रेरणास्थानं आहेत. त्यांच्या वर प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. त्यांना जातीपातीची लेबलं लावणे हा करंटेपणा आहे. दुर्दैवाने सध्या ते वारंवार घडताना दिसत आहे. 

आणखी महत्त्वाचा गंभीर मुद्दा म्हणजे आपल्या वर्तमान व भविष्याचा विचार न करता भुतकाळातील मुडदे उकरुन आपापसात वादविवाद व प्रसंगी मारामारी करण्याचे वाढते वेड हा होय. इतिहास हा फक्त वर्तमानात वावरताना चुका टाळणे व स्फुर्तीदायी घटनांपासुन प्रेरणा घेऊन भविष्य घडविण्यासाठी वापरायचा असतो. 

पण आपण सगळेच त्या दृष्टिकोनातुन इतिहासाचा वापर करतो आहे का, यावर शांतपणे बसून विचार करण्याची वेळ आता आली आहे. घटनेने आपल्याला दिलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आपापसात आपले भारतीयत्व ठळक करण्यासाठी वापरण्याची आवश्यकता आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्वतःला ' मी सर्वात आधी आणि शेवटी भारतीय मानतो' असे विषद करतात. बाबासाहेबांचा हाच संदेश आपल्याला प्रत्येक मनापर्यंत पोहचवायचा आहे. 

आपल्या सर्व जातीय, प्रांतीय, भाषीक अस्मिता बाजूला ठेऊन एक ' भारतीय ' म्हणून आता सर्व समाजापुढे आदर्श निर्माण करण्यासाठी आपला आळस झटकून पुढे येण्याची गरज आहे. या हेतूनेच दिनांक ४/१/२०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता अलका चौक ते वैंकुठ स्मशानभुमीपर्यंत पुण्यातील काही संघटनांकडून 'जातीयवादाची अंत्ययात्रा ' आयोजित करण्यात आली आहे. 

आपण सगळ्यांनी या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक सलोखा राखण्याच्या जबाबदारीचा आपापला खारीचा वाटा उचलु. 

कुसुमाग्रजांनी गीतबद्ध केलेल्या पुढील ओळी आपल्या साठी प्रेरणादायक ठरोत हि अपेक्षा...

"सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायाला करा हिमाचल लक्ष खडे
समरपुरीचे वारकरी हो, समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहात आजला एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते"

~ कुसुमाग्रज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com