द. आफ्रिकेत मानवसदृश प्राण्याचे अस्तित्व

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

कालांतराने मानवाचे वंशज "होमो सॅपियन्स'चाच एक घटक असलेल्या "होमीनिन'पासून जैविकदृष्ट्या वेगळे झाले. या नव्या संशोधनामुळे "होमो नालेदी' या मानवाच्या प्रजातीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे

क्रोमद्राई (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन लाख वर्षांपूर्वी मानवसदृश प्राण्याचे अस्तित्व होते, तुलनेने लहान मेंदू असणाऱ्या या प्राण्यासोबतच मानवाचे पूर्वज वाढले, त्यानंतर काही काळाने हे मानवसदृश प्राणी नष्ट झाले असावेत, असा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे. "इ-लाइफ' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये हा दावा करण्यात आल्याने मानवाच्या उत्क्रांतीसंबंधीच्या प्रस्थापित सिद्धांतांना तडा गेला आहे. "होमो सॅपियन्स'च्या आधी अस्तित्वात असलेल्या "होमीनिन'पासून आजचा आधुनिक मानव उत्क्रांत झाल्याचा दावा काही संशोधक करतात.

चिंम्पाझी, गोरिला यांच्यासोबतही मानवाचे वंशज वावरले, त्यानंतर कालांतराने मानवाचे वंशज "होमो सॅपियन्स'चाच एक घटक असलेल्या "होमीनिन'पासून जैविकदृष्ट्या वेगळे झाले. या नव्या संशोधनामुळे "होमो नालेदी' या मानवाच्या प्रजातीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वी या प्रजातीचे जीवाश्‍म आढळून आले होते.

प्रस्थापित सिद्धांताला तडा
जोहान्सबर्गपासून वायव्येला 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका शेतामध्ये उत्खनन करत असताना संशोधकांना काही नवे जीवाश्‍म सापडले असून, यामुळे मानवी उत्क्रांतीच्या प्रस्थापित सिद्धांताला तडा जाऊ शकतो. उत्खननामध्ये सापडलेले "होमो नालेदी' या मानवी प्रजातीचे जीवाश्‍म साधारणपणे 20 लाख वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.

साय-टेक

मुंबई : अगदी चिमुरड्यांपासून ते जेष्ठांमध्ये विंडोजमध्ये सर्वात लोकप्रिय फीचर असलेल्या एमएस पेंटची मायक्रोसॉफ्टने साथ सोडली आहे....

बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई : रिलायन्स जिओच्या 4जी फीचर फोनची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतोय. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश...

सोमवार, 24 जुलै 2017

नवे ऍप्लिकेशन "स्पार्क' दाखल न्यूयॉर्क : ऍमेझॉन कंपनीने आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या दिशेने...

शुक्रवार, 21 जुलै 2017