राज्यातील आदर्श कार्य; घटबारी धरणात 95 टक्के जलसाठा

ghatbari dam
ghatbari dam

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकाणी शिवारातील गेल्या वर्षी फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता.साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभागातून व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाल्याने नुकतेच आमदार डी. एस. अहिरे व तहसीलदार संदीप भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. सध्या धरणात 95 टक्के जलसाठा असून 56 लाखांचे काम केवळ 8 ते 10 लाखात पूर्ण झाल्याने जनतेसह शासकीय यंत्रणेनेही तोंडात बोटे घातली आहेत.

यावेळी निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, वनविभागाचे अधिकारी एस.के.सिसकर, महेश पाटील, मंडळाधिकारी श्री. चित्ते, तलाठी श्री.रोझेकर, कृषी विभागाचे अधिकारी श्री. राऊत, श्री. वाघमोडे व श्री. गायकवाड, आरएसएस प्रणित जलसमिती व महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानचे रवींद्र खैरनार, अनुलोमचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पाडवी, श्रावण चव्हाण, खुडाणेच्या सरपंच कल्पना गवळे, उपसरपंच नामदेव गवळे, माजी सरपंच धनराज गवळे, ग्रामपंचायत सदस्य कन्हैयालाल काळे, सामाजिक कार्यकर्ते पराग माळी, पांडुरंग महाले आदींसह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तालुक्याचे आमदार डी. एस. अहिरे, तहसीलदार संदीप भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार डी.एस. अहिरे म्हणाले की खुडाणे ग्रामस्थांची जिद्द, चिकाटी व एकी वाखाणण्याजोगी असून कोणत्याही प्रकारच्या शासकीय व आर्थिक मदतीशिवाय सामूहिक प्रयत्नातून मिळालेले हे सांघिक यश आहे. ही संपूर्ण राज्यासाठी व देशासाठी अभिमानाची बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या आदर्श कामाची माहिती नक्कीच देईल असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

घटबारी धरणाच्या कामाचे श्रेय कुणीही लाटू नये..
"घटबारी धरणाच्या बांधकामाचे खरे श्रेय खुडाणे ग्रामस्थांसह खुडाणे ग्रामपंचायत, घटबारी जलसंधारण समिती, ट्रॅक्टर युनियन, अनुलोम, आरएसएस प्रणित जलसमिती व महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्यासह ज्यांनी श्रमदानासह आर्थिक योगदान दिले अशा सर्व ज्ञात-अज्ञात लोकांना जाते. त्यामुळे घटबारी धरणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा लोकप्रतिनिधीने करू नये." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते पराग माळी यांनी "दैनिक सकाळ"शी बोलताना दिली.

घटबारी धरणाच्या जलपूजन प्रसंगी उपस्थित आमदार डी.एस.अहिरे, तहसीलदार संदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, खुडाणेच्या सरपंच कल्पना गवळे, उपसरपंच नामदेव गवळे, माजी सरपंच धनराज गवळे, पराग माळी, कन्हैयालाल काळे, पांडुरंग महाले आदींसह ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com