हिरे घासणाऱ्याचा मुलगा बनला 'लेफ्टनंट'

dhule
dhule

धुळे (म्हसदी) : बळसाणे (ता. साक्री) येथील प्रमोद राजेंद्रसिंग गिरासे यांची चेन्नई येथे सैन्यदलात सैन्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.सुरतला(गुजरात) हिरा बनवणा-या कंपनीत हिरा घासणा-या राजेंद्रसिंग खंडू गिरासे यांच्या सुपुत्राने गरिबीची जाण ठेवत मेहनतीने खानदेशाचे नाव मोठे केले आहे.खानदेशात तो एकमेव असल्याचे सांगितले जाते.

माळमाथा परिसरातील बळसाणे गावात यातून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.गरीब,सामान्य कुटुंबातील गिरीसे परिवार पोटाच्या खळगी भरण्यासाठी पचंवीस वर्षापूर्वी गुजरातेत सुरत येथे स्थलांतरीत झाला. हिरा बनवण्याच्या  कंपनीत प्रमोदचे वडील राजेंद्रसिंग गिरासे यांनी हिरा घासण्याचा रोजगार स्विकारला.स्वतःची अवघ्या दोन एकर क्षेत्रात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अवघड होते.परिस्थितीचे भान राखत प्रमोदचे आई-वडिलांनी सुरतची वाट धरली. पोटा पाण्यासह दोन मुलांचा शिक्षणाचा प्रश्न गिरासे कुटुंबासमोर उभा होता.संघर्षला तोंड देत दोन्ही मुलांना सुरत येथील मराठी माध्यमाच्या मानसेवा हायस्कूलमध्ये शिकायला टाकले.याच हायस्कूलमध्ये प्रमोद पहिले ते बारावी पर्यंत शिकला.मग...पुढे काय म्हणून विचार सतावत होता.

बारावी नंतर मित्र,शिक्षक व नातेवाईकांच्या सहकार्याने प्रमोदला लोणखेडा(ता.शहादा) येथील डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. साठी प्रवेश घेतला.तिथेही परिस्थितीशी दोन हाथ द्यावे लागले.वडिलांनी रात्रीचा दिवस करत प्रमोदला पैसे पुरवले. बी.ई.नंतर जानेवारी2016ला बेंगलोर येथे सर्व्हिस सिलेक्शनात लेप्टन म्हणून संधी मिळाली.तीन ऑक्टोबर 2016 ते 9 सप्टेंबर2017 या काळातील अकरा महिने चेन्नईत ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी केद्रांत प्रशिक्षण घेतले.नुकतेच भारतभर सैन्यातील उच्चपदांची निवड झाली. त्यात भारतातून सुमारे तीनशे व राज्यात अवघ्या सात जणांची तर खानदेशातून एकमेव प्रमोदची निवड झाली आहे.प्रमोदचा लहान भाऊ श्यामही केवळ शिष्यवृत्तीच्या व आई-वडिलांच्या बळावर पुण्यात बी.ई.करतो आहे.लाख रुपये देणगी घेणा-या महाविद्यालयात शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अवघ्या अकरा हजार रुपयात करत असल्याचे मामा नरेंद्रसींग गिरासे (कढरे)यांनी सांगितले.

जिद्द आणि मेहनतीची तयारी हवी...!
अजूनही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती बरोबरच  मार्गदर्शनाचा अभाव असल्याची खत प्रमोद गिरासेने "सकाळ"जवळ व्यक्त केली.विद्यार्थी केवळ एमपीएससी वा यूपीएससीचाच अधार घेताना दिसतात.तो मार्ग योग्यही असला तरी याशिवाय अनेक पर्याय असल्याचे गिरासेचे मत आहे.घरी बसून कोणतीही प्रगती होणार नाही.हे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.कुटुंबाची जबाबदारी आर्थिक मदत आणि शिक्षकांची शिकविण्याची आहे.मेहन आणि धाडस करण्याची जबाबदार स्वतःची असल्याचे प्रमोद मानतो.म्हणून घर,गांवपेक्षा बाहेरचे जग विद्यार्थ्यांनी पहावे असे आवाहन तो विद्यार्थ्यांना करतो.प्रत्येक पालक पैसे भरून शिकवू शकत नाही.म्हणून निराश न होता मित्र,शिक्षक वा सेवाभावी संस्थाकडून मार्गदर्शन घेतले हमखास मार्ग सापडतो असा विश्वास त्याने व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com