'डीजे'साठी सासरच्यांनी केला विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

दीपक कच्छवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सर्वोच्च न्यायालयने डीजे बंद करण्याचे आदेश दिले असले, तरी जामदा (ता.चाळीसगाव) येथील सासर असलेल्या दिपाली गोरख काकडे या विवाहितेचा 7 जुन 2015 ते 16 मे 2017 पर्यंत सासरच्या मंडळींनी संगनमत करून डीजे आणण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे. या मागणीसाठी दिपाली काकडे हिला मारहाण करून अंगावर असलेले सोन्याचे दागिने काढुन घेतले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : एकिकडेसर्वोच्च न्यायालयाने डीजे वर बंदी घातली आहे. मात्र दुसरीकडे डीजे घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे या मागणीसाठी जामदा (ता.चाळीसगाव) येथील विवाहितेच्या सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयने डीजे बंद करण्याचे आदेश दिले असले, तरी जामदा (ता.चाळीसगाव) येथील सासर असलेल्या दिपाली गोरख काकडे या विवाहितेचा 7 जुन 2015 ते 16 मे 2017 पर्यंत सासरच्या मंडळींनी संगनमत करून डीजे आणण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे. या मागणीसाठी दिपाली काकडे हिला मारहाण करून अंगावर असलेले सोन्याचे दागिने काढुन घेतले. शिवाय घराच्या बाहेर हाकलून दिले.

त्यामुळे मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यातील आलेल्या कागदपत्रावरून  गोरख काकडे (पती), रामदास काकडे (सासरा), कलाबाई काकडे ( सासु), भोलेनाथ काकडे (जेठ), रेखा काकडे ( जेठाणी), चंद्रकला काकडे, छाया नवसरे ( नंनद) सर्व राहणार जामदा यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पृथ्वीराज कुमावत हे करीत आहेत.