शेतकरी संघटनेचा एक आॅगस्टला राज्यव्यापी मसूदा मोर्चा

जगन्नाथ पाटील
बुधवार, 26 जुलै 2017

कापडणे (जि.धुळे) - कर्जमाफीबाबत राज्य शासन दररोज नवा शासन आदेश काढीत आहे. शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी नेमके काय करावे हेच शासनाला सुचत नाही. याचे नेमके उत्तर शेतकरी संघटनेकडे आहे.

शेतकर्‍यांची कर्जफेड करण्याची इच्छा आहे. त्यासाठी शेतीमालाला रास्त भाव पाहिजे. यासाठी एक मसुदा संघटना शेतकर्‍यांना देणार आहे. हा मसुदा मोर्चा काढून जिल्हाधिकारी मार्फत शासनाला सादर केला जाणार आहे ;  या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी येथे जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी माजी अध्यक्ष शांतूभाई पटेल, आत्माराम पाटील, धनराज पाटील, नारायण माळी, बन्सिलाल माळी, जगन चौधरी, डिगंबर पाटील, भगवान पाटील, रामकृष्ण पाटील, छगन पाटील आदी उपस्थित होते.

एक आॅगस्टला राज्यव्यापी मसूदा मोर्चा
एक आॅगस्टला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मसुदा मोर्चा संघटनेतर्फे काढले जाणार आहेत. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना कर्जमुक्तीचा मसुदा दिला जाणार आहे. ते शासनापर्यंत पोहचवितील. नागपूर येथे संघटनेचे राज्यव्यापी बैठक झाली. त्यावेळी निर्णय झाला आहे.

दरम्यान धुळे शहरात एक आॅगस्टला दहाला वीर सावरकर पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. यात सर्वपक्षीय शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रघुवंशी यांनी केले आहे.